fbpx

प्रियांकांकडं एखादं पद देणं ही काँग्रेसची घराणेशाही नव्हे,शिवसेनेने केली कॉंग्रेसची पाठराखण

टीम महाराष्ट्र देशा- घराणेशाही आणि कॉंग्रेस याचं तस जूनचं नाते आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या पाठोपाठ प्रियांका गांधी वाड्रा देखील सक्रीय राजकारणात दिसणार आहेत. त्यांच्यावर पक्षाने उत्तरप्रदेशच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. प्रियांका गांधी वाड्रा यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केल्यामुळे गांधी कुटुंबाचे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेना असं झालं आहे. प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशानंतर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

प्रियांका गांधी यांना राजकारणात उतरवण्याचा काँग्रेसचा निर्णय अचूक आणि योग्य वेळी घेतला गेलेला आहे, असं म्हणत शिवसेनेने कॉंग्रेसवर स्तुतिसुमने उधळली आहेत. ‘उत्तर प्रदेशात काँग्रेसला या निर्णयाचा नक्कीच फायदा होईल. यूपीत २१ ते २२ जागा अशा आहेत, जिथं काँग्रेसचं अस्तित्व आहे. त्या जागांवर विजय मिळवण्यासाठी प्रियांकांचा नक्कीच उपयोग होईल असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

प्रियांकांकडं एखादं पद देणं ही काँग्रेसची घराणेशाही आहे असं आम्ही मानत नाही. या देशात अशी काही घराणी आहेत, ज्यांच्यावर लोकांचं प्रचंड प्रेम आहे. मग तुम्ही या घराण्यांवर कितीही टीका करा. शिवाय, प्रियांका गांधी यांनी राजकारणात यावं अशी काँग्रेसमध्येच भावना होती,’ याकडंही राऊत यांनी लक्ष वेधलं.

1 Comment

Click here to post a comment