काँग्रेस ना दिलवाली आहे, ना दलितवाली कॉंग्रेस फक्त डीलवाली- नरेंद्र मोदी

चित्रदुर्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. कर्नाटक निवडणुकीचे प्रचाराचे वारे जोराने वाहू लागले आहेत. ‘जो पक्ष गरिबांचं ‘वेल्फेअर’ करू शकत नाही, त्या पक्षाला जनतेने ‘फेअर वेल’ दिलं पाहिजे,’ असा टोला मोदींनी लगावला.

‘काँग्रेस ना दिलवाली आहे, ना दलितवाली, फक्त डीलवाली आहे,’ अश्या शब्दात नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर कणखर टीका केली. चित्रदुर्ग येथे आयोजित प्रचार सभेत नरेंद्र मोदी बोलत होते.

काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, “काँग्रेसच्या काळात भारत रत्न पुरस्कार केवळ एकाच कुटुंबासाठी राखीव होता. म्हणूनच बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांना पुरस्कार देण्यात आला नाही. त्यांना पुरस्कार देण्याचं काम आम्ही केलं. दिल्ली, महू, मुंबई आणि नागपूरमधील त्यांच्या स्मारकासाठी आमचं सरकार काम करत आहे” असे ते म्हणाले.

 

Latur Advt
You might also like
Comments
Loading...