काँग्रेस आता एका कुटुंबाचा पक्ष होतोय; महिला काँग्रेस आमदाराचा घरचा आहेर !

gandhi family

रायबरेली : काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अनेक नेते त्यांच्यापासून दूर जात आहेत. काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली. तर, राजीव सातव यांचेआकस्मिक निधन झाल्याने राहुल गांधी यांनी अत्यंत जवळचा व विश्वासू सहकारी गमावला. आता उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

जितिन प्रसाद यांनी आज केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, नड्डा भाजपा मुख्यालयात अनुपस्थित होते.

जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केल्यानंतर आता उत्तरप्रदेश मधील रायबरेलीच्या काँग्रेस आमदार अदिती सिंह यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. ‘जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडल्याने पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. सिंधिया आणि जितीन प्रसाद यांच्या सारख्या बड्या नेत्यांनी काँग्रेसला सोडल्यानंतर आता पक्षाने आत्मचिंतन करण्याची वेळ आलीये. काँग्रेस हा पक्ष आता एका कुटुंबाचा होत आहे. जितीन प्रसाद यांना भाजप पक्षात चांगलं भविष्य आहे,’ असं अदिती सिंह म्हणाल्या आहेत. दरम्यान, अदिती सिंह यांना काँग्रेसच्या बंडखोर आमदार म्हणून ओळखलं जातं.

जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याला प्रियांका गांधी कारणीभूत ?

राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील जितिन प्रसाद आहेत. उत्तर प्रदेशमधील नेते आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या प्रसाद हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. उत्तर प्रदेशमध्ये पक्षासाठी ब्राह्मण समाजाच्या संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. मागील काही काळापासून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या सक्रिय झाल्या आहेत. तेव्हापासून प्रसाद यांना डावलले जात असल्याचे चित्र आहे. प्रसाद यांनी प्रियांका यांना थेट विरोध केलेला नसला तरी ते नाराज होते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP