नवी दिल्ली – भाजप हा पक्ष अपवाद सोडला तर देशातील बहुतेक राजकीय पक्ष एकाच कटुंबांची खासगी मालमत्ता झाले आहेत, असा घणाघाती आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केला आहे. पुढे जे पी नड्डा म्हणाले, कॉंग्रेस कोठे उरली आहे ? काँग्रेसतर आपली विचारसरणी गमावलेला एका भावाबहिणीच्या मालकीचा पक्ष झाला आहे. राज्यस्तरावरील प्रादेशिक पक्ष तर केवळ सत्तेच्या समीकरणासाठी जाती व धर्माच्या आधारावर स्थानिक लोकांचे ध्रुवीकरण करतात, असा जोरदार हल्लाबोल जे पी नड्डा यांनी केले आहे.
राजस्थानमधील जयपूर शहरात लीला पॅलेस हॉटेलमध्ये आज भाजपची राष्ट्रीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मोदींनी देशभरातून सहभागी झालेल्या १३२ पक्षनेत्यांना संबोधित केले. मोदींनी दिल्लीतूनच आॅनलाईन भाषण केले व त्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. रविवारी ते या बैठकीला पुन्हा मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.
यावेळी मोदींनी पक्षातील सकारात्मक बदलांवर भाष्य केले. देशाचा प्रत्येक नागरिक सरकारकडून काय काय काम केले गेले, याचा हिशोब अपेक्षित करत असतो. सरकार आपल्यासाठी काम करत आहे, हे पाहण्याची त्याची इच्छा असते. कामाचे परिणामही आपल्या डोळ्यांसमोर झाले पाहिजेत असे तो सांगतो. भारतीय जनता पक्षाने लोकांच्या विचारांमध्ये केलेला हा बदल सर्वार्थाने सकारात्मक बदल आहे, असे आपण मानत असल्याचे मोदी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :