काँग्रेस ही संस्कृती असून त्यापासून देशाला मुक्त करायचं आहे : मोदी

narendra modi vr congress

टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेस ही संस्कृती असून त्यापासून देशाला मुक्त करायचं आहे. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा कॉंग्रेसमुक्त भारत हा मुद्दा चर्चेत आणला आहे. देशात लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्या असताना या निवडणुकींत काय मुद्दे असणार याकडे देशाच लक्ष आहे. मोदींनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुलाखतीतून धमाका केला आहे.

‘मन की बात’ करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे का देत नाही, असा आरोप होत असतानाच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने घेतलेली मोदी यांची दीर्घ मुलाखत मंगळवारी संध्याकाळी ट्विटरच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या चाडेचार वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. मुलाखतीही मोजक्याच दिल्यात. मात्र नवीन वर्षाची सुरुवात मोदी मुलाखतीने केली आहे. अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर मोदींनी यावेळी भाष्य केलं.

दरम्यान, याच मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस,सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला. मोठ्याने बोलणारे नेते जामीनावर बाहेर आहेत. आर्थिक गैरव्यवहाराचा त्यांच्यावर आरोप आहे आणि तेच लोक आज खोटी माहिती पसरवित असल्याचा घणाघात त्यांनी केला. लोकसभेची 2019 ची निवडणुक ही मोदी विरूद्ध सर्व अशी नाही तर जनता विरूद्ध आघाडी अशी आहे असा दावा देखील मोदी यांनी केला आहे.

1 Comment

Click here to post a comment