हिंदूंना आतंकवादी संबोधून कॉंग्रेसने हिंदूंचा अपमान केला : मोदी

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपच्या मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते. आपल्या भाषणातून मोदींनी विरोधी पक्षांची अक्षरशः पिसे काढली. काँग्रेसने सातत्याने हिंदूंचा अपमान केला असल्याचा आरोप करताना मोदींनी सुशिलकुमार शिंदेच्या भाषणाची आठवण करून देत हिंदूंना आतंकवादी संबोधून कॉंग्रेसने हिंदूंचा अपमान केला असल्याचा घणाघात केला.

काँग्रेसने कोट्यवधी भारतीयांची मान शरमेने झुकवली, या पापातून काँग्रेसला कधीच मुक्ती मिळणार नाही, जनता काँग्रेसला धडा शिकवेल असा विश्वास देखील मोदींनी व्यक्त केला. मला आशीर्वाद देण्यासाठी लोकांची गर्दी, ही गर्दी बघून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडेल असं देखील ते म्हणाले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेली अनेक वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीने विदर्भावर अन्याय केला. मात्र मोदींमुळे विदर्भावरील अन्याय दूर झाला. विदर्भाच्या पुत्राला मुख्यमंत्री बनवलं, विदर्भातील अनेक पुत्रांना मंत्री बनवलं, विदर्भात 15 वर्षात जे आघाडी सरकारकडून विकास झाला नाही तेवढा विकास आम्ही या 4 वर्षात विदर्भात केला आहे.