राजस्थानात सत्ता कॉंग्रेसचीच, पण मुख्यमंत्री कोण ?

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. विजयानंतर आता राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात या तिन्ही राज्यात मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांनी आपल्या हालचाली सुरु केल्या आहेत. काँगेसचा अनुभवी चेहरा, की नवे नेतृत्व याबाबत अजूनही वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.  पण अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष राहुल गांधी निर्णय करतील, अस सांगण्यात येईल

गेहलोत कि पायलट ?

राजस्थानमध्ये सध्या दोन प्रमुख नावामध्ये चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस असलेले अशोक गेहलोत यांचे नाव पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. तर प्रदेशाध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे तरुण सहकारी असलेले सचिन पायलट हेदेखील शर्यतीत आहेत.

अपक्षांना सोबत घेऊन सरकार चालवण्याची तयारी कॉंग्रेसची आहे, अशोक गेहलोत अनुभवी मानले जातात. सचिन पायलट यांनीही तयारी सुरु केली आहे. अंतिम निर्णय दिल्ली मधून येणार असल्याने दिल्लीचा कौल नक्की कोणाच्या बाजूने येतो, हे पाहंणही महत्वाच असणार आहे.

पाच राज्यांच्या निकालानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत परतीची लाट, भाजपमध्ये गेलेले नेते करणार घरवापसी