काँग्रेसला पेट्रोल डिझेल दरवाढीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

blank

मुंबई : देशभरात आज (२९ जून) पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले पाहायला मिळत आहेत. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५ पैशांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरात प्रति लिटर १२ पैशांची वाढ झाली आहे. काल (२८ जून) पेट्रोल-डिझेलमध्ये कोणतीही दरवाढ झाली नव्हती. मात्र, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत.

आमदार महेश लांडगे यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर दिली ‘ही’ लक्ष्यवेधी प्रतिक्रिया

गेल्या महिन्यात उत्पादन शुल्कात मोठी वाढ करण्यात आल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाच्या बिकट परिस्थितीला जनता तोंड देत असताना इंधनाच्या दरात सातत्याने वाढ करुन जनतेची खुलेआम लूट करण्याचा कार्यक्रम मोदी सरकारने चालवला आहे असा आरोप विरोधक करत आहेत.

देशभरात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सातत्याने सुरू आहे. या विरोधात काँग्रेसने आज देशभर आवाज बुलंद केला आहे. याविरोधात कॉंग्रेसने आंदोलनास सुरूवात केली आहे.दरम्यान,कॉंग्रेस नेत्यांकडून भाजपवर या मुद्द्यावरून शरसंधान होत असताना भाजपनेते आ. आशिष शेलार यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

…आणि आमचे स्वयंघोषित देशभक्त निघाले चिनी मालावर बहिष्कार टाकायला – जितेंद्र आव्हाड

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनूसार तेलाचे भाव आपल्या देशातील तेलाचे भाव ठरवण्याचा निर्णय मागील काँग्रेस सरकारच्या काळात झाला. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव जसे वाढतात तसे आपल्या देशातील भाव वाढत आहेत. ही बाब आम्ही नम्रपणे जनतेपर्यंत पोहोचत आहोत. काँग्रेसच्या काळात हा निर्णय झाल्यामुळे आता काँग्रेसला या भाव वाढीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ते केवळ राजकारण करीत आहेत. जर त्यांना जनतेची एवढीच काळजी असेल तर मग महाराष्ट्र मध्ये पेट्रोल डिझेलवर आकारलेला कर त्यांनी माफ करावा. त्यांनी कर लावल्यामुळे अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल महाग झाले आहे, अशी प्रतिक्रिया मुंबईत आशिष शेलार यांनी दिली.