‘काँग्रेसने कर्नाटकाला IT Hub बनवले, भाजपा Porn Hub बनवत आहे..!!’

कर्नाटक

मुंबई: कर्नाटकमधील भाजपचे नेते, बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची अश्लील सीडी सार्वजनिक झाली आहे. नोकरीचे आमिष दाखवून त्यांनी एका मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. बेंगलुरू येथील नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कल्लाहल्ली यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. कल्लाहल्ली यांनी सांगितले की मी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलीसोबत हा प्रकार घडला असून काल मंगळवारी हा सगळा प्रकार चर्चेत आला आहे. नोकरी देण्याच्या बदल्यात लैंगिक संबंधांची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी बेंगळुरूमध्ये मंत्री रमेश जारकिहोळी यांच्याविरोधात धरणे आंदोलन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांनतर या प्रकरणातील वाद वाढल्यानंतर मंत्री रमेश जारकिहोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी बुधवारी आपला राजीनामा मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना सादर केला. यानंतर रमेश जारकिहोळी म्हणाले, आरोप हे तथ्यहीन आहेत. माझा असा विश्वास आहे की मी निर्दोष आहे, परंतु मी नैतिक कारणास्तव राजीनामा देत आहे. असे त्यांनी म्हटले

यावरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी ट्विट करत खोचक टीका केली आहे. ‘काँग्रेसने कर्नाटकाला IT Hub बनवले. भाजपा कर्नाटकाला Porn Hub बनवत आहे..!!’, असं जगताप यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. कर्नाटकची ओळख आयटी हब अशी आहे. कर्नाटकची ही ओळख आणि भाजप नेत्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण यावरून जगताप यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या