मुख्यमंत्री असताना कॉंग्रेसने १२ वर्ष त्रास दिला – नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा : दिल्ली येथील रामलीला मैदानावर सुरु असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.या कार्यक्रमाला अनेक केंद्रीय मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले, जेंव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते तेंव्हा त्यांना कॉंग्रेसने १२ वर्ष त्रास दिला.पण त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास होता.मोदींनी कॉंग्रेसवर संवैधानिक संस्थांचा अपमान करीत असल्याचा आरोप केला.यावेळी कार्यकर्त्यांना त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत जीव ओतून काम करण्याचे आवाहन केले तर ही लढाई सत्ता आणि संविधानवर आस्था ठेवणाऱ्यांमधील लढाई आहे.एकीकडे सत्ता मिळवण्यासाठी एकत्र झाले आहेत तर एकीकडे आपण आहोत जे संविधानसाठी लढत आहोत, असंही यावेळी मोदी म्हणाले.

You might also like
Comments
Loading...