कॉंग्रेस आघाडीचा जागावाटपाचा फार्म्युला ठरला , मात्र मनसेला डच्चू

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकाही न लढवण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार असल्याची चर्चा आहे. तर कॉंग्रेस आघाडीतही मनसेला जागा नसल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले आहे. तसेच निवडणुकीच्या बहिष्कारा बाबतची मनसेची भूमिका मान्य नसल्याचही शरद पवार म्हणाले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदार आणि खासदारांनी भाजप सेनेत प्रवेश केला आहे. तसेच आता खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी राज्य दौऱ्याचे नियोजन करून प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार ते आज नाशिक येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी शरद पवार म्हणाले की, आगामी विधनसभा निवडणूक कॉंग्रेस , राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शेकाप अशी आघाडी करून एकत्रित निवडणुक लढवणार आहोत. मात्र कॉंग्रेस आघाडीत राज ठाकरे यांच्या मनसेला जागा नाही. तसेच विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर होत असल्याने मनसे निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याच सांगितल जात आहे. ही मनसेची भूमिका बरोबर नाही ती अमान्य आहे, असे पावर म्हणाले.

दरम्यान अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप सेनेत प्रवेश केल्याने आता पक्षातील नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. तसेच राष्ट्रवादीत येणाऱ्यांबाबत समिती निर्णय घेणार अशी , माहिती शरद पवार यांनी दिली. तसेच तसेच या विधानसभेला काँग्रेस – राष्ट्रवादीमध्ये 125 – 125 मित्रपक्षांना 38 जागा असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे जागा वाटप होताच नाशिक , मुंबई , नागपूरमध्ये सभा घेणार असल्याच, पवार यांनी यावेळी सांगितले.