‘संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं बाबासाहेबांना रोखलं होतं’

टीम महाराष्ट्र देशा- बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार काँग्रेसला नाही. संविधान सभेत जाण्यापासून काँग्रेसनं बाबासाहेबांना रोखलं होतं. निवडणुकीत बाबासाहेबांना काँग्रेसनचं हरवलं होतं, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाना साधला आहे.अनुसुचित जाती मोर्च्याच्या समारोपाप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस नागपूरात बोलत होते.यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.इंदूमिलची जागा काँग्रेसला बळकवायची होती, असा आरोप देखील त्यांनी यावेळी बोलताना केला.

भाजपने अनुसूचित जातीसाठी मोठे काम केले आहे. काँग्रेसने फक्त त्यांचा ‘व्होटबँक’ म्हणून वापर केला आहे. काँग्रेसचा इंदू मिलच्या जागेवर डोळा होता. त्यामुळेच केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार असतानाही स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळू शकली नाही, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.