नाराजीचे कारण ठरलेल्या ‘महाजॉब्स’च्या जाहिरातीत काँग्रेसला मिळाले स्थान; या नेत्याचे झळकले फोटो

Mahavikas Aghadi mantrimandal

मुंबई: भाजपाला धक्त देत महायुतीमधून शिवसेना बाहेर पडली आणि सत्तेच्या गणिताचा मेळ बसवत शिवसेनेने, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. यानंतर मात्र, या आघाडीतील पक्षांमध्ये पहिल्या सहामाहीमध्येच अंतर्गत नाराजीचे सूर बाहेर येऊ लागले होते. विरोधी बाकावर बसलेल्या भाजपाने तर या सरकारवर निशाणा साधण्याची कोणतीही संधी न सोडता ‘हे सरकार फार काळ टिकणार नाही’, असा अंदाज लावला होता.

दरम्यान, हे सरकार सामान्य जनतेच्या हिताचे, त्यांच्या मनाप्रमाणे असून अत्यंत कष्टाने स्थापन झालेले आहे, त्यामुळे ५ वर्षेचं काय कायम टिकेल असे महाविकास आघाडीतील नेत्यांनी सांगितले. दरम्यान, पारनेर घटनेनंतर शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये आलेली तात्काळ नाराजी असो व सुरुवातीपासुनच राष्ट्रवादीला झुकते माप देत जास्त महत्व दिले जाते असे काँग्रेस नेत्यांनी केलेली तक्रार असो, या कुरबुर चालुच असल्याचे दिसून आले.

चार-पाच लफडी ठेवणं शिवसेना आमदार खासदारांचा धंदा; निलेश राणेंचा घणाघात

महाजॉब्सच्या याआधीच्या जाहिरातीत काँग्रेस नेत्यांचा फोटो नव्हता. यावेळी मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खालोखाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा फोटो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भव्य फोटो डावीकडे आहे, तर उजव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, तसेच क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री अदिती तटकरे यांचे फोटो आहेत.

मुंबईसह धारवीचं ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने केलं पुन्हा कौतुक

आधी, महाजॉब्सच्या जाहिरातीत केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, त्यावर युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे आणि खासदार राजीव सातव यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत  केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याने, सत्यजीत तांबे यांनी जुलै महिन्यात सवाल उपस्थित केला होता. “महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची? किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी का होत नाही” असे प्रश्न सत्यजीत तांबे यांनी विचारले होते.

#सामना_रोखठोक:…तर पंतप्रधान मोदींवर देखील राजीनाम्याची वेळ येऊ शकते!

तर, राजीव सातव यांनी ट्वीट करुन त्यांचं म्हणणं मांडलं होतं. “योजना चांगली आहे आणि आमचे पूर्ण सहकार्य आहेच. फक्त सरकार आघाडीचे आहे याची काळजी लोकांसमोर जाताना सर्वांनीच घ्यायला हवी. येत्या काळात या जाहिरातीत दुरुस्ती होईल अशी आशा. पुन्हा अशी चूक होणार नाही या खात्रीसोबत.”उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी फोन करुन संबंधित प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी त्यावेळी टीव्ही 9 मराठीला सांगितलं होतं.

IMP