सरकार विरोधात कॉंग्रेसचा एल्गार, राज्यभरात घेणार ५० सभा

मुंबई: आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला सत्तेतून खेचण्यासाठी कॉंग्रेसकडून राज्यभरात जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर आता राज्यभरात आणखीन ५० सभांचे नियोजन कॉंग्रेसकडून करण्यात आले आहे. याची सुरुवात दौलताबाद येथील सभेने होणार आहे.

कॉंग्रेसकडून काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेचे दरम्यान पक्ष नेत्यांनी राज्यभरात साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करत. एकूण १२० विधानसभा क्षेत्रामध्ये जाहीर सभा घेतल्या होत्या. दरम्यान, आता सरकार विरोधातील संघर्षाची धार आणखीन वाढवण्यासाठी ५० वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर सभा घेत सरकारचे अपयश लोकांच्या समोर मांडणार असल्याचं, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.