भोर नगरपालिकेवर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व, चौरंगी निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय

चौरंगी निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय ; 17 पैकी 17 जागा जिंकून सत्ता कायम राखली

टीम महाराष्ट्र देशा : भोर नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसने 17 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय मिळवत सत्ता कायम राखली आहे. ही  निवडणूक चौरंगी असल्याने काँग्रेसला याचा फटका बसतो कि काय अशी शंका व्यक्त केली जात होती. गेले अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्ष या भागात ठाम पणे कायम आहे मात्र यंदा तो  विजय होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु या निवडणुकीत भोरच्या मतदात्यांनी कॉंग्रेसला आपला कौल देऊन पुन्हा एकदा सत्तेत आणले. त्यामुळे या चौरंगी निवडणुकीत कॉंग्रेसचा मोठा विजय मानला जात आहे.

यंदाच्या निवडणूकीत पहिल्यांदाच नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी थेट जनतेतून निवडले गेले. यामध्ये काँग्रेसच्याच निर्मला आवारे 6960 मत मिळवून 4121 मदानी दणदणीत विजयी झाल्या आहेत. तर, ९ महिला व नगराध्यक्ष एक अशा १० महिला असल्याने पालिकेत महिलाराजची परिस्थिती झाली आहे.

तुमचा अन्ना मुख्यमंत्री झालाय मात्र… ; कुमारस्वामींना अश्रू अनावर

अरे बापरे ! काँग्रेस बारामतीतून लढणार म्हणजे आमचं डिपॉजिटच जप्त होणार : अजित पवार

You might also like
Comments
Loading...