नानांच्या हाती पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा

राहुल गांधींच्या उपस्थितीत केला काँग्रेस मध्ये प्रवेश

नवी दिल्ली : भाजप मध्ये आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो. संविधान विरोधी काम करणाऱ्या केंद्र शासनाने युवक, शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब, शेत मजुरांसाठी, सुशिक्षित बेरोजगारांसाठी व महिलांच्या न्याय हक्कासाठी माझ्या लढवय्या वृत्तीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जातोय. असा आरोप करून भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या नाना पटोले यांची काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा आज खरी ठरली. नाना पटोले यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली. तसेच काँग्रेसच्या इशाऱ्यावरच नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे, असा आरोप करीत भाजपाने पटोले यांच्या राजीनाम्याचे खापर काँग्रेसवर फोडले आहे.

bagdure

मे महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत पटोले यांनी शेतकरी व ओबीसींचे प्रश्न उपस्थित केले. मात्र, मोदींनी त्यांचे काहीही ऐकून न घेता त्यांना बसायला लावले. तेव्हापासून पटोले हे मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. भाजपमधील नेते, मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गोडवे गात असतांना पटोले यांनी त्यांच्यावरच टीकास्त्र सोडल्याने भाजपामध्ये भूकंप झाला होता. काँग्रेसच्या इशाऱ्यावरच नाना पटोले यांनी राजीनामा दिला असे भाजप ने स्पष्ट केले.

You might also like
Comments
Loading...