कॉंग्रेसचा ‘पंजा’ संकटात ; १८ एप्रिल रोजी सुनावणी

टीम महाराष्ट्र देशा : भाजप सरकारविरोधात विरोधकांची मोट बांधत असताना आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीला अवघा एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिलेला असताना कॉंग्रस पक्षाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. यावेळेस कॉंग्रेसला वाचाळविरांनी अडचणीत आणलं नसून कॉंग्रेसचा ‘पंजाच’ यावेळेस अडचणीत आला आहे. काँग्रेसचं निवडणूक चिन्ह असलेला ‘पंजा’च्या वैधतेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर १८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोग या याचिकेवर सुनावणी घेणार आहे. याबद्दल भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी याचिका केली होती.

bagdure

भाजपचे नेते आणि वकील असलेल्या अश्विनी उपाध्याय यांनी काँग्रेसचं निवडणूक चिन्ह अवैध ठरवावं, यासाठी निवडणूक आयोगाकडे याचिका केली होती. ‘निवडणूक आचारसंहितेनुसार, शरीराचा कोणताही अवयव निवडणूक चिन्ह असू शकत नाही. यासोबतच निवडणूक चिन्ह घेऊन कोणीही मतदान केंद्रावर जाऊ शकत नाही, असाही नियम आहे मात्र काँग्रेसचं निवडणूक चिन्ह हाताचा पंजा असल्यानं या दोन्ही नियमांचं उल्लंघन होतं,’ असं सर्वोच्च न्यायालयात वकिली करत असलेल्या उपाध्याय यांनी सांगितलं.

आता काँग्रेसचा ‘पंजा’च संकटात सापडल्यानं पक्षासमोरील अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाविरोधात उपाध्याय यांनी २९ जानेवारीला निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती.

You might also like
Comments
Loading...