शुक्ला,महाजन, शिंदे,देवरा यांना धक्का;कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी कुमार केतकरांना संधी

kumar ketkar

टीम महाराष्ट्र देशा- भाजपने राज्यसभेसाठी 18 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसनेही एकूण 10 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यातून ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि विचारवंत कुमार केतकर यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. केतकर हे गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षाची बाजू हिरीरीने मांडत होते. अखेर त्यांच्या या कामगिरीची दखल पक्षाने घेतल्याचे सांगण्यात येते.

माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, राजीव शुक्ला आदींची नावे खासदारकी साठी चर्चेत होती. मात्र या राहुल गांधी यांनी केतकर यांच्या नावाला पसंती दर्शवत अनेकांना धक्का दिला.डॉ. रत्नाकर महाजन यांच्या नावाची देखील चर्चा होती तशी शिफारस प्रदेश काँग्रेसने केंद्रीय नेतृत्वाला केली होती, मात्र या शिफारशीला केराची टोपली दाखवण्यात आली. अत्यंत साधी राहणी, उच्च विचारसरणी व अनेक विषयांचा सखोल अभ्यास असलेल्या महाजन याचं राज्यसभेत असणं कॉंग्रेस साठी निश्चितच फलदायी ठरलं असत मात्र राहुल गांधी सर्वाना धक्का देत केतकर यांच्या नावाला पसंती दिली.