Karnataka Election : पुन्हा एकदा कॉंग्रेस नेत्यांकडून राहुल गांधी हटावचा नारा

कर्नाटक – कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत आहे. भाजप ११0 कॉंग्रेस 72 तर जेडीएस 38 जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीकडे लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहण्यात येत असल्याने दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

दरम्यान या निवडणुकीत भाजपने कॉंग्रेसला मात देत विजयाकडे वाटचाल केल्याने. पुन्हा एकदा कॉंग्रेस नेत्यांकडून राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, प्रियांका गांधींकडे कॉंग्रेसचे नेतृत्व स्वपवण्याची मागणी होत आहे.

काँग्रेसचे नेते जगदीश शर्मा यांनी राहुल गांधी यांना प्रियांका गांधी यांच्यासोबत काम करायला हवे. जर असं झालं तर काँग्रेसला विजय मिळू शकतो अशी कबुलीच शर्मांनी दिली. राहुल गांधी मेहनत करताय. त्यांना पंतप्रधान सुद्धा व्हायचंय. पण दोघांनी मिळून काम केले तर त्याचा फायदा काँग्रेसला होईल अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

You might also like
Comments
Loading...