Share

Congress | शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त करा ; राज्यपालांकडे काँग्रेसची मागणी

Congress | मुंबई : परतिच्या पावसामुळे शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, तरी देखील राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला नसून गेल्या तीन महिन्यांमध्ये राज्यात शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, तरुण, विद्यार्थी, महिला, सर्वसामान्य नागरिकांसह कोणत्याही घटकाला दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे काँग्रेस (Congress) पक्षाकडून शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Govt) बरखास्त करण्याची मागणी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे करण्यात आली आहे.

राज्य सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्याला मदतीचे पॅकेज देण्याची आवश्यकता आहे. पण सरकारने अद्याप कोणतीही मदत दिलेली नाही, असं यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
यादरम्यान, गेल्या तीन महिन्यांमध्ये १.५४ लाख कोटी रुपयांचा वेदांता फॉक्सकॉन, तीन हजार कोटींचा बल्क ड्रग पार्क, आणि २२ हजार कोटींचा टाटा एअरबस असे तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यामुळे राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. एवढंच नाही तर बेरोजगारांना मिळणारे रोजगार हिरावले आहेत. आपल्या देशातील बेरोजगारी गेल्या ४५ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे, असं देखील नाना पटोलेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, लाखो पदे रिक्त असतानाही सरकार नोकरभरती करत नाही. प्रकल्प बाहेर जात असल्याने खासगी क्षेत्रातही रोजगार उपलब्ध होत नाहीत. परिणामी राज्यातील तरुण हताश व निराश झाले आहेत, अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे.

दिल्लीतील वरिष्ठांच्या इशाऱ्यावर खाली मान घालून गप्प बसतात आणि वर ‘खोटे बोल, पण रेटून बोल’ या पद्धतीने वागतात, अशी खोचक टीका नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. तसेच फडणवीस व भाजपने मोदी सरकारकडे जाऊन महाराष्ट्राची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली पाहिजे, यासाठी काय प्रयत्न केले ते सांगावे, असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Congress | मुंबई : परतिच्या पावसामुळे शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांनी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now