राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची युती तोडण्याची गुजरात प्रदेश काँग्रेसची मागणी

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या गुजरात राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने विश्वासघात केल्यामुळे या पक्षांबरोबरची युती तोडण्याची मागणी गुजरात प्रदेश काँग्रेसने केली आहे. गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत.

bagdure

राज्यसभा निवडणुकीत हे दोन आमदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या बाजूने मतदान करणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले होते . मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पटेल यांना मत दिले नाही. संयुक्त जनता दलाचे आमदार छोटू वसावा यांनी पटेल यांना मत दिल्यामुळेच ते निवडून आले, असे गुजरात प्रदेश काँग्रेस नेत्यांनी सांगितले .

काँग्रेसने १ सप्टेंबर रोजी वलसाड जिल्ह्यातील पार्डी येथे सभेचे आयोजन केले आहे. मात्र, काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला या सभेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले नसल्याचे समजते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी काँग्रेसने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अहमद पटेल यांच्या बाजूने मतदान केल्याचे त्यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...