विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसकडून भाजपला दणका !

बंगळुरु : कॉंग्रेसने भाजपला पुन्हा एकदा दणका दिला आहे. जयानगर येथे झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार सौम्या रेड्डी यांनी भाजपचे उमेदवार बी. एन. प्रल्हाद यांचा पराभव केला आहे.

काँग्रेस आणि भाजपने जयानगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी जोरदार प्रचार झाला. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी यांनी ५४४५७ मते मिळविली. तर, भाजपाच्या बी. एन. प्रल्हाद यांना ५१५६८ मते मिळाली. त्यामुळे भाजपाला मोठा झटका बसला आहे. ११ जूनला मतदान घेण्यात आले होते. यावेळी ५५ टक्के मतदान झाले.

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

आरोग्यम धनसंपदा आयुर्वेद सर्वासाठी

१२ मे रोजी कर्नाटकात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. जयानगर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार बी. एन. विजय कुमार यांचे निधन झाले. त्यानंतर याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

Shivjal