देशात वैद्यकीय संरक्षण वस्तूंचा तुटवडा असताना ३५ लाख ग्लोज निर्यात; कॉंग्रेसकडून मोदींवर टीका

angry modi

टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाचं संकट वाढत असताना आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या वैद्यकीय सुरक्षेसाठीच्या सामग्रीची मात्र देशात टंचाई आहे. मात्र आता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातून मोठ्याप्रमाणात वैद्यकीय साहित्य सर्बियाला पाठवण्यात आलं आहे. याबाबतची माहिती युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम इन सर्बियाने ट्वीटरवर दिली आहे. हे २९ मार्चच ट्वीट आहे.

याबाबत माहिती अशी कि केरळ मधील एका खाजगी कंपनीने सोमवार हे ३५ लाख ग्लोज सर्बियामध्ये निर्यात केले आहे. तसेच फक्त मास्क आणि N-95 मास्कच्या निर्यातीवर वर बंदी असल्याने कस्टम विभागकडून त्यांना परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे.

आता यावरून कॉंग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशातील आरोग्य सेवक हे मिळेल ते वापरून स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत असताना भारतातून ९० मेट्रिक टन एवड्या मोठ्या प्रमाणात साहित्य निर्यात केलं जात आहे. हा गुन्हा आहे अशी टीका कॉंग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली आहे.

तसेच कॉंग्रेसचे दुसरे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनीही मोदींना उद्देशून ट्वीट केलं आहे. ते म्हणतात, आदरणीय पंतप्रधानजी. आपले डॉक्टर, नर्स , आरोग्य सेवक आणि कोरोना रुग्ण वैद्यकीय संरक्षण वस्तू मागत आहेत. रेनकोट , हेल्मेट घालून त्यांना काम कराव लागतंय. आपल्याकडे देश आणि आपले लोकं प्रथम का नाही’

हेही पहा –