मुंबई: सध्या राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावरून सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. दरम्यान या संदर्भात उत्तर प्रदेश मधील योगी सरकारने दिल्ली प्रदूषणामध्ये उत्तर प्रदेशचा कोणताही हात नसल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. उत्तर प्रदेश मधील प्रदूषित हवा ही दिल्लीच्या दिशेने जात नाही तर पाकिस्तानच्या बाजूने येणारी हवा दिल्लीवरील हवेवर परिणाम करत असल्याचा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला आहे. आता यावरच काँग्रेस नेते तथा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut)यांनी योगी सरकारवर निशाना साधला आहे.
पाकिस्तान नसता तर यांनी आपले अपयश कुणावर लादले असते? असा सवाल करणारे ट्वीट करत मंत्री नितीन राऊत यांनी योगी सरकारवर निशाना साधला आहे. दरम्यान योगी सरकारच्या दाव्यावर सरन्यायाधीशांनी आता आम्ही दिल्लीतील उद्योगांवर बंदी आणावी का? असा सवाल करत योगी सरकारला फटकारले आहे. एनसीआर मधील हवा प्रदूषणावरील याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान योगी सरकारच्यावतीने अॅड. रंजीत कुमार यांनी बाजू मांडली. यावेळी त्यांनी दिल्लीमधील प्रदुषणाला आम्ही नाही तर पाकिस्तान जबाबदार असल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तान न होता तो ये अपनी नाकामी किस पर थोपते? pic.twitter.com/iJooS34q32
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) December 5, 2021
दरम्यान गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमधील शाळा प्रदूषणामुळे बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सरकारने शाळा पुन्हा सुरू केल्याने सर्वोच्च न्यायालयाने सरकारची कानउघडणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी आल्या व महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या- संजय राऊत
- ‘मुंबईला ओरबाडून ज्यांना आपली राज्ये विकसित करायची आहेत त्या राज्यांचा विकास म्हणजे तात्पुरती सूज’
- ‘… पण महाराष्ट्राप्रमाणेच बंगाल झुकणार नाही’, ममता बॅनर्जींचा इशारा
- ‘…आता राजकारणाची सूत्रे हाती घ्यायला हवीत’, आदित्य ठाकरेंना बॅनर्जींचा सल्ला
- …तेव्हा काश्मीरमध्ये शांतता होती का?- अमित शहा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<