राज्यात फडणवीस सरकार आल्यापासून प्रशासन मोकाट – कॉंग्रेसचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र कॉंग्रेसने फडणवीस सरकारवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून निशाण साधला आहे. फडणवीस सरकार आल्यापासून प्रशासन मोकाट झाले आहे की, अपंग शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नसतानाही त्यांच्या सातबाऱ्यावर कर्ज दाखवून गैरव्यवहार करण्यात आला. अशी टीका कॉंग्रेसने केली आहे.

एका अपंग शेतकऱ्याला कर्ज मिळाले नसतानाही त्यांच्या सातबाऱ्यावर कर्ज दाखवून गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर यामुद्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. याच दरम्यान महाराष्ट्र कॉंग्रेसनेही या प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधला. फडणवीस सरकार आल्यापासून प्रशासन मोकाट झाले असून गैरव्यवहारांची पातळी एवढी वाढली आहे की अपंग शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नसतानाही त्यांच्या सातबाऱ्यावर कर्ज दाखवून गैरव्यवहार करण्यात आला आहे, अशी टीका कॉंग्रेसने केली,

इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटलं तर याकडे लक्ष द्यावं असे म्हणत, असंही तुमच्याकडून काही अपेक्षा राहिलेली नाही, असा टोलाही कॉंग्रेसने लगावला.