‘जातीयवादी संघाचा इतिहास अभ्यासक्रमात घालून भाजप संघाची विचारसरणी थोपावतंय’

टीम महाराष्ट्र देशा : नागपूर विद्यापीठाकडून बी. ए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल करत अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश केला आहे. दरम्यान या मुद्यावरून महाराष्ट्र कॉंग्रेसने भाजपवर निशाणा साधला. जातीयवादी संघाचा इतिहास अभ्यासक्रमात घालून भाजप सरकार संघाची विचारसरणी थोपवू पाहतंय, अशी टीका कॉंग्रेसने केली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बी.ए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)च्या इतिहासाचा समावेश केला आहे. 1885 ते 1974 या कालखंडात भारताचा इतिहास या भागाचा समावेश आहे. हा भाग शिकवताना संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान देखील विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे.

आतापर्यंत कोणत्याच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आरआरएसच्या इतिहासाचे धडे दिले गेले नाहीत. मात्र नागपूर विद्यापीठाने अभ्यासक्रमात आरएसएसच्या इतिहासाचे धडे घेतल्याने महाराष्ट्रातील नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात होती.

याचदरम्यान या मुद्यावरून महाराष्ट्र कॉंग्रेसने भाजपवर निशाणा साधला. ज्या आरएसएसने नेहमी संविधानविरोधी भूमिका घेतली ज्या आरएसएसचे स्वातंत्र्य लढ्यात काडीमात्र योगदान नाही अशा जातीयवादी संघाचा इतिहास अभ्यासक्रमात घालून भाजप सरकार संघाची विचारसरणी थोपवू पाहतंय, असे महाराष्ट्र कॉंग्रेसने म्हंटले. इतकेच नव्हे तर परंतु काँग्रेस त्यांचा हा कुटील डाव कधीही साध्य होऊ देणार नाही. असेही कॉंग्रेसने म्हंटले आहे.Loading…
Loading...