fbpx

कोल्हापूरच्या महापौरपदी कॉंग्रेसच्या स्वाती येवलुजे; शिवसेनेचा कॉंग्रेसला पाठींबा 

कॉंग्रेस

कोल्हापूर: कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी कॉंग्रेसच्या स्वाती येवलुजे तर उपमहापौर पदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील पाटील हे विजयी झाले आहेत. आज झालेल्या महापालिका सभेत यवलुजे यांना 48 तर भाजपच्या मनीषा कुंभार यांना 33 मते मिळाली.

८१ सदस्य असणाऱ्या कोल्हापूर महापालिकेत कॉंग्रेस २९, राष्ट्रवादी १५ तर ताराराणी आघाडी १९ , भाजप १४ आणि शिवसेना ४ नगरसेवक आहेत. या निवडणुकीत शिवसेनेन कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला पाठींबा दिला.