ही तर काँग्रेसची आत्महत्या – स्वामी

swami

टीम महाराष्ट्र देशा- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग आणण्याचा प्रस्ताव देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला असून आता काँग्रेसवर टीका होऊ लागली आहे. असा प्रस्ताव दाखल करणं ही म्हणजे काँग्रेसची आत्महत्या असल्याचा टोला भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी लगावला आहे.

‘त्यांनी (वेंकय्या नायडू) घेतलेला निर्णय योग्यच आहे. यासाठी त्यांनी दोन दिवसाचा वेळ देखील घ्यायला नको होता. हा निकामी आणि निरर्थक प्रस्ताव आधीच फेटाळून लावला पाहिजे होता. काँग्रेस हा प्रस्ताव आणून एकप्रकारे आत्महत्याच केली आहे असं स्वामी म्हणाले.दरम्यान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पदावरून दूर करण्यासाठी कॉग्रेसनं सादर केलेला महाभियोगाचा प्रस्ताव उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी फेटाळला आहे.

विरोधकांनी मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्याविरूद्ध दिलेल्या महाभियोगाच्या प्रस्तावास हिरवा कंदील देण्यास उपराष्ट्रपतींनी नकार दिला आहे. पण दरम्यान त्याआधीच काँग्रेसच्या नेत्यांकडून असं सांगण्यात आलं होतं की, जर मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधातला महाभियोगाच्या प्रस्ताव नकारला तर काँग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाईल. त्यामुळे आता काँग्रेसची पुढची भूमिका काय असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.