काँग्रेस उमेदवार शरद रणपिसे व डॉ. वजाहत मिर्झा यांचे उमेदवारी अर्ज दाखल

नागपूर : १६ जुलै रोजी होणा-या विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांचे उमेदवार आ. शरद रणपिसे व डॉ. वजाहत मिर्झा यांनी आज विधानभवनात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. नसीम खान, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. चंद्रकांत रघुवंशी, आ. रामहरी रूपनवर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते.

विधानपरिषदेसाठी शिवसेनेचा एकला चलो रे चा नारा !

निरंजन डावखरे यांची पक्षातून ६ वर्षासाठी हकालपट्टी – सरचिटणीस शिवाजीराव गर्जे

You might also like
Comments
Loading...