मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील एका हॉटेलमध्ये एकूण ४० आमदारांसह उपस्थित आहेत आणि सरकार स्थापन करण्याच्या त्यांच्या आग्रहावर ठाम आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी एकतर भाजपसोबत सरकार बनवावे किंवा स्वत:कडे लक्ष द्यावे, असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. या पार्श्वभूमीवर काल उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. दरम्यान सुमित खांबेकर यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे.
“अरे त्या काँग्रेसला तरी कोणी विचारा, उमेदवार त्यांचा पडला, थयथयाट त्यांनी करायचा हे काय दुसरच…! एकतर चुकून त्यांना सत्ता मिळाली, स्वप्नातही त्यांनी विचार केला नव्हता, कॉंग्रेसचा उमेदवार पडला ते वेगळच पण सत्तेचे ताट देखील ओढून घेतलं”, असे ट्विट करत सुमित खांबेकर यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे.
अरे त्या काँग्रेसला तरी कोणी विचारा,
उमेदवार त्यांचा पडला,
थयथयाट त्यांनी करायचा हे काय दुसरच…!
एकतर चुकून त्यांना सत्ता मिळाली,
स्वप्नातही त्यांनी विचार केला नव्हता,उमेदवार पडला ते वेगळच पण सत्तेचे ताट देखील ओढून घेतलं.@INCIndia
— Sumit Khambekar (@KhambekarSumit) June 23, 2022
संजय राऊत यांची प्रतिक्रिया –
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत काल लाइव्हमध्ये दिले आहेत. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, “शिवसेना हा पक्ष स्वतंत्र आहे आणि विधिमंडळ पक्ष वेगळा आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणतीही बैठक बोलवली नाही. बैठक नाही फक्त आमदार भेटणार आहेत आणि त्यानंतर दोन आमदार शिंदे कडून आलेत त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. १२ नंतर शिवालय किंवा वर्षावर होईल”.
महत्वाच्या बातम्या –