कॉंग्रेस नेत्याचे बेलगाम वक्तव्य, भटक्या गायी म्हणजे मोदींची आई

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते जोरदार प्रचार सभा घेत आहेत. तर या प्रचार सभांमधून बेलागम वक्तव्य करत आहेत. काँग्रेसचे नेते विनय कुमार पांडे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना बेलगाम वक्तव्य केले आहे. ‘भटके बैल म्हणजे मोदींचे वडील आणि भटक्या गायी म्हणजे मोदींची आई’, अशी वादग्रस्त टीका पांडे यांनी केली आहे.

भटक्या जनावरांच्या बाबतीत बोलताना विनय पांडे यांची जीभ घासली ते म्हणाले की, ‘जेव्हा लोकं प्रवास करत असतात त्यांना रस्त्यावर काही बैल व गायी दिसतात. ही भटकी जनावरं शेतकऱ्यांसाठी तापदायक असतात व कायम त्यांच्यासाठी काही ना काही व्याप निर्माण करून ठेवतात. रस्त्यावरही या भटक्या जनावरांमुळे ट्रॅफिक निर्माण होते. त्यावेळी त्या गायींना बघून लोकं बोलतात बघा मोदी व योगींचे वडिल रस्त्यावर बसलेत. काही बोलतात मोदींची आई रस्त्यावर झोपली आहे’, असे वादग्रस्त वक्तव्य पांडे यांनी केले आहे.

दरम्यान या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक नेते टीका करण्याच्या नादात बेलागम वक्तव्य करत आहेत. त्यामुळे राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस खाली येताना दिसत आहे.