मोदींना कॉंग्रेस रोखू शकत नाही – ओवेसी

blank

टीम महाराष्ट्र देशा – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. काँग्रेसकडे ही क्षमता नाही. त्यामुळे मोदींना रोखण्यासाठी काँग्रेस हा पर्याय नाही. त्यामुळे जर भाजपाला पराभूत करायचे असेल आणि मोदींना पंतप्रधान बनण्यापासून रोखायचेअसेल भाजपा-कॉंगेसेतर नेत्यांना पुढे यावे लागेल. असे मत एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले आहे.
टीआरएस प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी अशा सर्व पक्षांना एकत्रित आणून भाजपाला पराभूत करावे, असही खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत जोरदार विजय मिळवल्यानंतर राव यांनी नवी आघाडी स्थापन करण्याची मनीषा बोलून दाखवली होती.
विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या नेत्यांना त्यांचा अहंकार नडला. तेलंगणातील जनतेने या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षांना नाकारले आहे .असेही ओवेसी म्हणाले.