काँग्रेस हा सध्या भाजपला पर्याय होऊ शकत नाही ; प्रकाश आंबेडकर

prakash ambedkar

मुंबई: कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी हिंसाचार उसळला. या हिंसाचाराचे पडसाद राज्यभरात उमटले. भारिपने ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या महाराष्ट्र बंदमागे नक्षलींचा हात होता हे भासवून सरकार बंदच्या बदमानीचा प्रयत्न करते आहे अशी टीका भारिपचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी केली. तसेच २०१९ ला काँग्रेस हा सध्या भाजपला पर्याय होऊ शकत नाही. असं मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काँग्रेस हा सध्या भाजपला पर्याय होऊ शकत नाहीसध्याची देशाची राजकीय परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांची क्लिन इमेज जपण्यात यशस्वी झाले आहेत. काँग्रेस २०१९ मध्ये भाजपला पर्याय ठरू शकतो असे मला वाटत नाही. असेही मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. कर्नाटक मध्ये होणाऱ्या निवडणुकांवर काँग्रेस आणि भाजप यांच्यातली खरी चुरस दिसून येईल. राहुल गांधी यांचे नेतृत्त्व चांगले आहे. मात्र सध्या तरी त्यांच्या करीश्मा चालेल असे नाही. काँग्रेस हा सक्षम पर्याय म्हणून २०२४ उभा राहू शकेल असे वाटते असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.