कॉंग्रेसने बोलावली भाजपविरोधी पक्षांची महत्वाची बैठक

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा बाकी आहे. अशातच कॉंग्रेसने भाजप विरोधी पक्षांची महत्वाची बैठक बोलावली आहे, त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधान आलं आहे.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी यूपीएतील घटकपक्षांची २३ मे रोजी महत्वाची बैठक बोलविली आहे. या बैठकीसाठी एनडीए सोबत नसलेल्या बीजेडी, टीआरएस आणि वायएसआर या पक्षांनाही निमंत्रण पाठवले आहे. या बैठकीसाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी चर्चा केली आहे. तेलगु देसम पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय लोक दल (आरएलडी), बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर वायएसआरचे जगनमोहन रेड्डी यांना सोबत घेण्यासाठी दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे.

दरम्यान, टीआरएसचे के. चंद्रशेखर राव यांनी उपप्रधानमंत्री करण्याची मागणी पुढे केली आहे त्यामुळे त्यांच्या या मागणीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.