काँग्रेसला दणका! भाजप मेघालयमध्ये मित्रपक्षांसह सत्ता स्थापन करणार

नवी दिल्ली: काँग्रेसला धक्का देत मेघालयमध्ये भाजप मित्रपक्षांसह सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा वर्तविण्यात येत आहे. मेघालयमध्ये भाजप एनपीपी, यूडीपी आणि एचएसपीडीपीसह २९ आमदारांची यादी घेऊन राज्यपालांची भेट घेणार आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या मॅजिक फिगरपेक्षा हा आकडा कमी आहे. मेघालयमध्ये बहुमतासाठी ३० सदस्यांची गरज आहे.

मेघालयात काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकून मोठा पक्ष ठरला असला तरी सत्ता स्थापनेसाठी त्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. मणिपूर आणि गोव्याच्या विधानसभेच्या वेळी केलेली चुक टाळून काँग्रेसने शनिवारी रात्रीच मेघालयचे राज्यपाल यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. पण, सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला यासाठी त्यांना अपक्षांची साथ मिळणे कठीण दिसत आहे.

भाजपमधील सूत्रांच्या माहितीनुसार सत्ता स्थापन करण्याची सायंकाळपर्यंत अधिकृत घोषणा होऊ शकते. तेसेच उद्याच शपथविधी सोहळा होऊ शकतो, एनपीपी नेते कोनरेड संगमा हे मेघालयचे मुख्यमंत्री असू शकतात. यूडीपी प्रमुख दनकपूर रॉय यांनी यासाठी पाठिंबा दिला आहे. तर मेघालयमध्ये २१ जागांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि कमलनाथ यांनीही राज्यपालांची भेट घेतली आहे. भाजपला एका अपक्षाचाही पाठिंबा मिळणार आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा सहज गाठता येऊ शकतो. मेघालायामध्ये भाजपकडे-२, काँग्रेस-२१, यूडीपी-६, एनपीपी-१९, अन्य-११ जागा आहेत.

You might also like
Comments
Loading...