आता राजकारणाचे धडे गिरवा कॉंग्रेस –भाजपच्या क्लासमध्ये

bjp vr congress

टीम महाराष्ट्र देशा: राजकारणापासून दूर जात असलेल्या युवा पिढीला पुन्हा राजकीय प्रवाहात घेवून येण्यासाठी आता चक्क राजकीय इंटर्नशीप सुरुवात करण्यात येत आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार कॉंग्रेस आणि भाजपकडून अशा इंटर्नशीपला सुरुवात केली जाणार आहे.

भारताला तरुणांचा देश मानल जात, मात्र आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये युवावर्ग राजकारण आणि राजकीय नेत्यांशी फारकत घेताना दिसत आहे, तसेच पारंपारिक राजकारणाने आज आधुनिक डिजिटल राजकारणाची कास धरली आहे, यामध्ये तरुणाचा सहभाग असणं गरजेच आहे, त्यामुळेच ह्या वर्षीपासून कॉंग्रेसकडून 30 वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थी व विद्यार्थींनीसाठी इंटर्नशीप प्रोगामची सुरूवात केली जाणार आहे. तसेच भाजप युवा मोर्चाकडूनही विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशीप सुरु करण्यात आली आहे.

यामध्ये पॉलिटिकल ट्रेण्ड, राजकीय पक्षांच्या तरुणाईकडून असलेल्या अपेक्षा, सोशल ट्रेण्ड व इतर महत्त्वाच्या गोष्टींचे धडे गिरवले जाणार आहेत. दोन्हीही पक्ष वर्षातून दोन वेळा ही इंटर्नशीपच आयोजन करणार आहेत