कर्नाटक निवडणूकीत काँग्रेसचा भाजपला धक्का…..

बंगळुरु : कर्नाटकमध्ये 31 ऑगस्‍टला झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली. या निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे.  त्यामध्ये कॉंग्रेसने आघाडी घेतली असून भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत एकूण  2664 जागांपैकी 2264 जागांचा निकाल घोषित झाला आहे.  त्यामध्ये काँग्रेसने 846, भाजपने 788, जेडीएसने 307 जागांवर विजय मिळवला आहे. तर 277 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

राज्यातील म्हैसूर, शिवमोगा आणि तुमाकुरू या जिल्ह्यांमधील नगरपालिका, नगरपरिषद आणि नगर पंचायतींसाठी हे मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकांसाठी 67.5 टक्के मतदान झाले आहे. दरम्यान, अद्यापही मतमोजणी सुरुच असून कदाचित उद्या सकाळपर्यंत अंतिम निकाल हाती येतील, असे एका संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. या निवडणुकांसाठी एकूण 8340 उमेदवार मैदानात उतरले होते. त्यामध्ये काँग्रेसकडून 2306, भाजपकडून 2203 आणि जनता दल सेल्युलरकडून 1397 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत.