fbpx

संविधान बदलण्याचा काँग्रेस – भाजपचा डाव – आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान व सरकारने मिळून सुप्रीम कोर्टाला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. संविधान बदलण्याचा डाव कॉंग्रेस भाजपा रचत असून हे दोन्ही पक्ष मिळून देशात अस्थिर परिस्थिती निर्माण करत आहेत, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

याशिवाय आंबेडकर यांनी भाजपवर नुकत्याच झालेल्या दंगली आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यांवरून भाजपवर निशाणा साधला. जाती-जातीत दंगल घडवून आणण्याचे डाव सरकार खेळत आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्याचा लढा वर्षानुवर्षे सुरू आहे. त्यांच्यासोबतच राज्यातील ३३ इतर जमातींचे प्रश्नही सुटलेले नाहीत असं ते म्हणाले . अटलबिहारी वाजपेयी यांनी सोलापुरात या समाजाचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील निवडणुकीत हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते पाळले नाही. २०१९ च्या निवडणुका तोंडावर असतानाही हा प्रश्न सुटलेला नाही. उलट धनगर-लिंगायत वाद पेटवण्याचे उद्योग भाजपच्या मंत्र्यांनी सुरू केले असल्याचा आरोप देखील आंबेडकर यांनी केला .