‘माणूस त्याच्या संगतीवरुनच ओळखला जातो’ ; आसारामच्या बहाण्याने कॉंग्रेसचा मोदींवर निशाणा

टीम महाराष्ट्र देशा : अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूला जोधपूर कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यानंतर काँग्रेसनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन आसाराम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मोदी आणि आसाराम एकत्र दिसत आहेत. ‘माणूस त्याच्या संगतीवरुनच ओळखला जातो,’ असं ट्विट करत काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसनं मोदी आणि आसारामचा व्हिडिओ ट्विट करत अप्रत्यक्षपणे मोदींना लक्ष्य केलं आहे. यानंतर काही ट्विटर वापरकर्त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांबरोबरचे आसारामचे फोटोदेखील पोस्ट केले आहेत. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आसारामचे आशीर्वाद घेत असतानाच फोटो काहीजणांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

You might also like
Comments
Loading...