काँग्रेसच्या प्रभारीपदावरून मोहन प्रकाश यांची उचलबांगडी ; मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदावरून अखेर मोहन प्रकाश यांची गच्छंती झाली आहे. तर त्यांच्या जागी कॉंग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज ही घोषणा केली.

गेली अनेक वर्षे महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी असलेल्या मोहन प्रकाश यांच्याबद्दल राज्यातील अनेक नेत्यांच्या तक्रारी होत्या. त्यांना बदलण्याची मागणीही केली जात होती. अखेर ती मान्य झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.