fbpx

कॉंग्रेस सत्तेत आल्यास वर्षाकाठी २० % गरीब जनतेला ७२ हजार रुपये देणार : राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गरिबांसाठी बंपर धमाका केला आहे. आमच सरकार जर २०१९ मध्ये आले तर किमान उत्पन्न योजने अंतर्गत आम्ही वर्षाकाठी २० % गरीब जनतेला ७२ हजार रुपये देणार आहोत अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली आहे. ते आज दिल्ली येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, सत्तेत आल्यास देशातील प्रत्येक घटकाला न्याय देणार असून न्यूनतम आय योजने अंतर्गत देशातील 5 कोटी कुटुंबांना म्हणजेच 25 कोटी जनतेला या योजनेचा लाभ मिळवून देणार आहे. तसेच एका कुटुंबाला सन्मानजनक आयुष्य जगण्यासाठी 12 हजार रुपयांची आवश्यकता असते त्यासाठी कॉंग्रेस सरकारकडून देशातील गरीब कुटुंबाला मासिक 12 हजार उत्पन्न देण्याची हमी राहुल यांनी दिली आहे.

मध्य प्रदेस, छत्तीसगड आणि राजस्थानमधील कर्जमाफीचं उदाहरण देत हे किमान उत्पन्नाचं आश्वासन देखील पूर्ण करु असा विश्वास राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान राहुल गांधीनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील टोला मारला आहे. ते म्हणाले की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात श्रीमंत लोकांना पैसे देऊ शकतात तर कॉंग्रेस पार्टी देशातील सर्वात गरीब जनतेला पैसा देऊ शकते.