fbpx

मुंबईत कॉंग्रेस – राष्ट्रवादीची संयुक्त बैठक संपन्न, जागावाटपासंदर्भात चर्चा

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची संयुक्त बैठक आज ( २३ जुलै ) मुंबईत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी पार पडली.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कॉंग्रेस -राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची संयुक्त बैठक आज मुंबईत पार पडली.

कॉंग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी ही संयुक्त बैठक पार पडली असून या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.

कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या या संयुक्त बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती तसेच, महाआघाडीच्या जागावाटपासंबंधी चर्चा झाली असल्याचे समोर आले आहे.