प्रतिक पाटलांच्या नाराजीचा कॉंग्रेस-स्वभिमानीला सांगलीत फटका बसणार

टीम महाराष्ट्र देशा- माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून यापुढे कोणत्याही राजकारणात भाग घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. पक्ष़ाने सांगलीतून बंधू विशाल पाटील यांना उमेदवारी दिली तर ठीक नाही तर ते अपक्ष लढतील, असेही त्यांनी जाहीर केले.

काँग्रेसने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. त्यामुळेच नाराज प्रतीक पाटील यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील यांना तसेच प्रतिक पाटील यांना मानणारा मोठा वर्ग सांगली परिसरात आहे. प्रतीक पाटील यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला तसेच स्वभिमानीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान,“मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे. मी काँग्रेस पक्षाशी माझं नात तोडलं आहे. वसंतदादाचे नाव हाच माझा पक्ष आहे”, असे सांगत प्रतीक पाटीलांनी काँग्रेसला राम-राम ठोकला आहे.