fbpx

स्वयंपाकघर जरी वेगळे असले, तरी काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस एकाच घरातील दोन मुले

टीम महाराष्ट्र देशा : स्वयंपाकघर जरी वेगळे असले, तरी काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस एकाच घरातील दोन मुले आहेत. राजकारण, समाजकारण किंवा क्रिकेट असो प्रत्येक ठिकाणी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असते. अशावेळी भांडयाला भांडे लागते. मात्र, त्यामुळे आमच्यातील प्रेम काही कमी झालेले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा ’’डीएनए’’ एकच आहे. असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहात महाविद्यालयीन युवतींना प्रोत्साहन देण्याकरीता आयोजित १९ वषार्खालील महिलांच्या सोनिया गांधी करंडक टी २० क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन स्वारगेट येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियम येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले.

यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सेक्रेटरी सोनल पटेल, मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर कमल व्यवहारे, कैलास कदम, नगरसेवक अजित दरेकर, वीरेंद्र किराड, काका चव्हाण, मुकारी अलगुडे, रुपाली चाकणकर, विकास टिंगरे, विवेक भरगुडे आदी उपस्थित होते.