कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे १६ आमदार आमच्या संपर्कात : रावसाहेब दानवे

Raosaheb_Danve

औरंगाबाद : कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणखी १६ आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक असून, ते आमच्या संपर्कात आहेत.एवढेच नव्हे तर कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेतेही रांग लावून उभे आहेत, असा गौप्यस्फोट केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे केला.

चिकलठाण्यात झालेल्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळाच्या कार्यक्रमात कॉंग्रेसच्या सरसाबाई वाघ यांच्यासह औरंगाबाद तालुक्यातील सरपंच,उपसरपंचासह काही कार्यकर्त्यांनी दानवे व बागडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या प्रवेशानंतर दानवे बोलत होते.

Loading...

दानवे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ४१ पैकी काही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आणखी १६ आमदार आमच्या संपर्कात आहेत. कॉंग्रेसचे दिग्गज नेतेदेखील भाजपत प्रवेशासाठी रांग लावून उभे आहेत. मात्र, सामाजिक समीकरण व राजकीय परिस्थिती विचार घेऊन त्यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

पक्षात इनकमिंग होत असल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याची गरज नाही. कुणी आले तरी आपले काम सुरूच ठेवायचे असते. एकनाएक दिवस तुम्हाला नक्कीच न्याय मिळतो, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. काश्मीरला विशेषाधिकार देणारे ३७० आणि ३५ अ हे कलम रद्द करण्यात आल्याने देशभरात भाजपबाबत विश्वासाची भावना निर्माण झाली असून, त्यामुळे २०२४ ची लोकसभा निवडणूकदेखील कॉंग्रेसच्या हातून गेली असल्याचा टोला दानवे यांनी लगावला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...