‘विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या ४० पेक्षा कमी जागा निवडून येतील’

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जलसंपदामंत्री गिरीश महाजन सध्या प्रचारात व्यस्त आहेत. यानिमित्त ते सातारा जिल्ह्यातील मान खटावमधील दहीवडीत जिहे कठापूर उपसा सिंचन योजना भूमीपूजन करण्यासाठी आले होते. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी या निवडणुकीत युतीची २४० च्या खाली एकही जागा येणार नाही आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ४० च्या वर जागा येणार नाहीत, तसेच गेल्या पाच वर्षात या सरकारवर कोणताही डाग नाही, गेल्या सरकारने अंगावर शाईच ओतून घेतली होती, असं म्हणत विकासाच्या जोरावर भाजप पुन्हा सत्तेत येईल असं विधान केले आहे.

तसेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे ४० पेक्षा कमी आमदार येतील. आघाडी सरकारसारख्या आम्ही भूलथापा मारत नाही. पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. मात्र कोणताही डाग अंगावर पडला नाही, पूर्वीच्या सरकारने अंगावर एवढी शाई टाकून घेतल्याने त्यांची जनतेने हकालपट्टी केली असल्याचे महाजन म्हणाले.

दरम्यान पुढे बोलताना ‘भाजपात छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी भाजपात प्रवेश केलाय. आघाडीत शब्द देत होते, मात्र ते पाळत नव्हते. त्यामुळे जो पाच वर्षात विकास झाला तो पूर्वी कधीच झाला नाही. त्यामुळे आघाडीत कोणीच राहण्यासाठी तयार नाही असंही महाजन म्हणाले आहेत.