काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था ही टांगा पलटी घोडे फरार झाल्यासारखी : नीलम गोऱ्हे

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीवर सडकून टीका केली आहे. राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था ही टांगा पलटी घोडे फरार अशी झाली असून पुण्यात देखील ती खिळखिळी झाली आहे. अशी टीका शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

देशात त्रिशंकू परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर मतदारांनी एनडीए हा पर्याय निवडावा असे आवाहन नीलम गोऱ्हे यांनी मतदारांना केले. पुढे बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नगरच्या जागेकडे जास्त लक्ष दिल्याने पुण्याच्या जागेकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे पुण्यामध्ये आघाडीची अवस्था खिळखिळी झाली आहे असं विधानं त्यांनी पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे.

तसेच मावळमध्ये श्रीरंग बारणे यांनी चांगले काम केले आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील चारही मतदार संघांमध्ये युतीचे उमेदवार निवडून येणार असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.