भारताला ‘संविधान’ कॉंग्रेस आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिले- राहुल गांधी

rahul gandhi

नवी दिल्ली : भारताला संविधान कॉंग्रेस आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. काँग्रेस पक्षानं आज संविधान बचाओ रॅलीचं आयोजन केलं होते.

संविधान आणि दलितांवरच्या कथित हल्ल्याच्या मुद्द्यांवर राष्ट्रीय पातळीवर आवाज उठवण्यासाठी  दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कॉंग्रेसच ‘संविधान बचाओ’ अभियान वर्षभर चालणार आहे.

काय म्हणाले राहूल गांधी ?

Loading...

जो शौचालय साफ करतो तो घाणही उचलतो. हे काम वाल्मिकी समाज कित्येक वर्षांपासून करतोय. वाल्मिकी समाजाच्या व्यक्तीला स्वतःचं पोट भरण्यासाठी हे काम करावं लागतं. परंतु पंतप्रधानांनी वाल्मिकी समाज अध्यात्मासाठी हे काम करत असल्याचं सांगितलं. देशात दलितांवरचा अत्याचार वाढत आहे. मोदींच्या हृदयात दलितांसाठी कोणतीही जागा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींची विचारधारा दलितांशी मिळतीजुळती नाही. देशाच्या संविधानाचा आवाज दाबण्यात येत आहे. असे बोलत राहुल गांधी यांनी मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.