केदार जाधव वरून भाजप – कॉंग्रेसमध्ये जुंपली

टीम महाराष्ट्र देशा : भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमधील पराभवाचे उट्टे आशिया कपमध्ये काढले. भारताने पाकवर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयात महाराष्ट्राच्या केदार जाधवने मोलाचे योगदान दिले होते. या सामन्यात त्याने ९ षटकात २३ धावा देत पाकच्या ३ महत्वपूर्ण विकेट मिळवल्या होत्या. पण, या गुणी खेळाडूवरुन भारतातील दोन मोठ्या राजकीय पक्षांनी राजकारण सुरु केले आहे.

काँग्रेस पक्षाच्या आयटी सेलच्या प्रमुख दिव्या स्पंदना-रमय्या यांनी ‘केदार जाधवची गोलंदाजीची शैली ‘लो’ आहे. पण, ती सतत घसरणाऱ्या रुपयाच्या मुल्याइतकी ‘लो’नाही.’ असे ट्विट केले.

दिव्या स्पंदना-रमय्या यांच्या या ट्विटला कर्नाटक भाजपने ट्विट करुन प्रत्युत्तर दिले. त्यांनी ‘केदार जाधव याच्या गोलंदाजीच्या शैलीबद्दल कल्पना नाही पण तुमचा बुध्दांक पाकिस्तानच्या संपूर्ण कामगिरीपेक्षा नक्कीच लो आहे.’ असे खोचक ट्विट केले.