fbpx

माढ्यात आघाडीला धक्का , कॉंग्रेस नेते कल्याणराव काळेंचा भाजपमध्ये प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येवून ठेपल्या असतानाचा माढा लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेस नेते कल्याणराव काळे यांनी कॉंग्रेसचा हात सोडत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती मध्ये हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. त्यामुळे कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांना याचा मोठा फटका बसणार असण्याची शक्यता आहे.

कल्याणराव काळे यांना पंढरपूर आणि माढ्यामध्ये मानणारा वर्ग मोठ्या संख्येने आहे. साखर कारखाना तसेच इतर संस्थांच्या माध्यमातून ते काम करत आहेत. माढा मतदारसंघात येणाऱ्या पंढरपूर भागातील ४३ गावांमध्ये काळे यांचा प्रभाव आहे. पंचक्रोषित काळे यांचा चांगलाच दबदबा असल्याने त्यांच्या या भाजप प्रवेशामुळे कॉंग्रेस आघाडीला चांगलाच फटका बसणार आहे.

या निवडणुकीत युतीचा उमेदवार म्हणून भाजप कडून रणजीतसिंह निंबाळकर यांना रिंगणात उतरवण्यात आल आहे तर रणजीतसिंह यांना आघाडी कडून संजय शिंदे यांचे आव्हान असणार आहे. या रंगतदार लढाई मध्ये आघाडी आणि युती कडून जोरदार प्रचार होत असतानाच कॉंग्रेस नेते कल्याणराव काळे यांनी कॉंग्रेसचा हात सोडत भाजपला जवळ केले आहे.